बहार

Advertisements

कोपरा… आठवणींचा…

साचलेली धुळ सारता सारता,

एक कोपरा सापडला… आठवणींचा..

जुन्या आठवणी.. वाटलं झाल्या असतील पुसट..

पण आजही तश्याच स्पष्ट आणि तेजस्वी..

मनाला ओढ लावून जावे कुणी,

अश्या आठवणी..

शब्दात मांडण्या पालिकडल्या,

पण पुन्हा न जगता येण्या अलिकडल्याच..

बऱ्याच गोष्टी सांगून जाणाऱ्या,

जिवाला हळवेपणा ओवणाऱ्या..

सुखी आणि समृद्ध जीवनाच्या शिकवणी देणाऱ्या,

आशा अन् दिशा दाखविणाऱ्या..

अगदी अंधारात पण दागिना लख्ख चमकावा,

तसा कोपर्‍यात असूनही त्यांचा एक वेगळाच

साज जाणवला.. भावून गेला..

अलगद पुन्हा नजरेस आले सारे क्षण

जागला तो स्वच्छ स्वभाव.. मोकळीक,

विचारसरणी घडविणारा भाव..

भास असावा कदाचित.. पण द्वेष जणु काटा बनून श्वासात रूतला

एेस पैस जागा असावी म्हणून आठवणी बाहेर नाही सारल्या,

कारण फक्त कोपरा असला तरी..

धुळ भरलेल्या कोपर्‍यात मला खजिना दिसला..

धुळ भरलेल्या कोपर्‍यात मला खजिना दिसला…

[Image source: pexels.com]

कौशल्य

एक पाण्याचा थेंब होता,
गारवा ज्याच्या रक्तात होता..
काळाच्या भरात ओढावत होता,
समुद्रात खारट.. नदीत गोड..
तर हवेत वाफ होत होता..
गवतावर पळत होता,
तर कमळावर नाचत होता..
चेहऱ्याला पाणीदार सौंदर्य,
तर अग्निला थंडावा देवून जात होता..
स्वतःचे अस्तित्व शोधायचा
जणू त्याला आता नाद लागला होता..
दुसर्यांसाठी जगता जगता
स्वतःला भेटू पहात होता..

वाटेवर चालता चालता अचानक
भेटला त्याला शिंपला..
म्हणाला, वेड्यावाणी जगतो
एक रात्र माझ्यात सामावून रहा..
थेंब होता थकला,
शिंपल्यात जाऊन निजला..
पहाटे उघडता डोळे, बघतो काय!
पाहिले एक नवीन रुप
नव्याने जसा तो जन्माला होता..

शिंपला आता त्याला सांगत होता,
कान देवून थेंब जे ऐकत होता..
आता राहिला नाही फक्त थेंब तू,
झाला आहेस मौल्यवान मोती तू..
आस राहिल तुझी सर्वांना,
कळेल किंमत तुझी जगाला..
पण होतास तू एक पाण्याचा थेंब
हे ठेव ध्यानात..
गारवा तुझा रक्तात असू दे..
चेहऱ्याला तसेच सौंदर्य देवून जा,
मानवी मनाला थंडावा देवून जा..
पाण्याचा थेंब आता समजला होता,
अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न त्याचा
आता यशस्वी झाला होता..

[Image source: pexels.com]

Blurred out..? Not for long…

The world front of my eyes has started to rotate.. round and round and round.. A couple of moments later, I could hardly put forward my feet on the ground.. Suddenly everything blurred out and my sight became dark.. The actions attempted by me, promised my future to leave a mark.. A thing now hurt me in the head.. Long after, I realized I had fallen down on my bed.. Nor the cigar, neither the alcohol, some minute drugs will cause me a brutal death, I thought.. The vein of my brain will potentially rupture releasing the blood clot by clot.. That put me through a long sequence of reel running forward.. All the moments revealed cynosure, telling me “You’re not coward”.. All the brightest mystic landmarks stood, faded one by one.. The present laughed at my toil, made my fun.. Bloody nightmare came to me and put me through reckless way.. My own Nebula too, now lowered down it’s sway.. The nocturnal groans reverberated in every sound.. For every move devoid of logic, opened up and expanded the bound.. The substratum of my ethical power broke down into fine pieces.. Governed before all the laws and impulses, now ditches.. Oh no.. I won’t let that happen so easy.. Nothing in the world could make my life fussy.. The distress, hah! I will make it the faggot, surely to burn.. Exactly, infinite lessons gory, had, in a manner made me learn.. For every tear that has barren me until now, I do have a much much better revenge to take.. Nevertheless, again all the blossomed smiles will plunge into phenomenal foreshadow, but no longer fake.. [Image source: pexels.com]